जाहिरात
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार उदय धकाते “श्रीगुरुदेव पत्रकारिता” पुरस्काराने सन्मानित

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. १० फेब्रुवारी)

ज्येष्ठ पत्रकार उदय बळीरामजी धकाते (गडचिरोली) यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या साहित्यानुरूप पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गोयेगाव मंडल-केरामेरी जि. आसिफाबाद (तेलंगणा स्टेट )येथे ‘श्रीगुरुदेव पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार दिवं. पुरुषोत्तम हिरादेवे स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती, चंद्रपूर (महाराष्ट्र) यांच्या वतीने प्रदान करण्यात आला.

पत्रकार उदय धकाते यांनी राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी पत्रकारिता आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून विशेष कार्य केले आहे. त्यांनी “ग्रामगिता घरोघरी” हा उपक्रम महाभारत न्यूजच्या युट्यूब चॅनेलद्वारे राबवून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या अमृतवाणीतील प्रवचने अनेक भागांतून थेट प्रसारित केली. तसेच श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या विविध उपक्रमांचे वृत्तांकन करून राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रचार-प्रसार केला. या कार्याची दखल राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेने घेतली.

मागील वर्षी गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच शालेय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांवर आधारित भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला होता. समाजप्रबोधन व राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी केलेल्या या कार्याबद्दल परिषदेकडून उदय धकाते यांचा गौरव करण्यात आला.

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या वतीने आयोजित २० वे आंतरराज्य राष्ट्रसंत साहित्य संमेलन तेलंगणा राज्यातील गोयेगाव येथे पार पडले. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक एड. पारोमिता गोस्वामी, उद्घाटक आमदार कोवा लक्ष्मी , श्री गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचार प्रमुख ग्राम. गोपाल कडू, ज्येष्ठ साहित्यिक ग्राम. बंडोपंत बोढेकर, एड. सारिका जेनेकर , श्रीकांत धोटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उदय धकाते यांना रोख रक्कम, मानवस्र, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व ग्रामगिता प्रदान करून कुटुंबीयांसह सत्कार करण्यात आला.

उदय धकाते हे १९९५ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी गडचिरोली पत्रिका मधून पत्रकारितेची सुरुवात केली. त्यानंतर चंद्रपूर समाचार, लोकसत्ता व लोकमत या वृत्तपत्रांतूनही त्यांनी कार्य केले आहे. सध्या ते सोशल मीडियावरील महाभारत न्यूज पोर्टलचे संपादक असून या पोर्टलला आठ कोटींहून अधिक वाचकांनी भेट दिली असल्याची नोंद आहे.

याप्रसंगी परिषदेचे सरचिटणीस एड. राजेंद्र जेनेकर, गडचिरोली पत्रिकेचे संपादक केशवराव दशमुखे,पत्रकार गोपालकृष्ण मांडवकर, अद्वैत चव्हाण,एड. सारिका जेनेकर, धर्मा गावंडे, अंजली भांडेकर, साक्षी भांडेकर व चेतन भजभुजे यांनी धकाते यांचे अभिनंदन केले.राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेने उदय धकाते यांच्या हातून यापुढेही जनकल्याणाचे कार्य घडत राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button