जाहिरात
ब्रेकिंग न्युज

३० वर्षीय महिला पोलीस शिपाई ने केली वैनगंगा नदी पात्रात आत्महत्या

Spread the love

लोकशाही न्युज,आरमोरी (दि,१ जुलै):

आरमोरी शहरापासून काही अंतरावर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पुलावरून एका तरुण महिला पोलीस शिपायाने नदीत उडी घेतली. सदरची घटना दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. शारदा नामदेव खोब्रागडे (वय ३० वर्ष) असे सदर महिला शिपाई चे नाव आहे. ती मुळची सिंदेवाही तालुक्यातील शिवणी येथील रहिवासी असून सध्या भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलीस स्टेशनला कार्यरत आहे.

शारदा खोब्रागडे यांनी पुलावर आपली दुचाकी उभी केली. तिथेच मोबाईलसुद्धा ठेवला आणि थेट नदीत उडी घेतली. हा प्रकार लक्षात येताच लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिकडे धाव घेतली. वैनगंगा नदीच्या पुलावर यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

सदर मृतक महिला पोलिसाचे शव रात्री ९ वाजताच्या सुमारास मिळाल्याची माहिती आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनात आरमोरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button