जाहिरात
महाराष्ट्र

३ डिसेंबर चे निकाल स्थगित, सर्व निकाल २१ डिसेंबर ला

न्यायालयाचा आदेश

Spread the love

लोकशाही न्युज,(दि. २ डिसेंबर)

महाराष्ट्रातील नगर परिषद निवडणुकांवर मोठा निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निवडणूक निकाल जाहीर करण्याच्या तारखेत महत्त्वाचा बदल केला आहे. निवडणूक आयोगाने काही नगर परिषदांच्या निवडणुका २ डिसेंबरऐवजी २० डिसेंबर रोजी घेण्याचे परिपत्रक नुकतेच काढले होते. मात्र ३ डिसेंबरला होणाऱ्या निकाल घोषणेचा परिणाम २० डिसेंबरच्या मतदानावर होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

यावर सुनावणी करताना न्यायालयाने याचिका मान्य केली असून, राज्यातील सर्व नगर परिषदांच्या निवडणुकांचे निकाल एकत्रितपणे आता २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.

या निर्णयामुळे २० डिसेंबरला मतदान होणाऱ्या नगर परिषदांवर आधीच्या निकालांचा कोणताही प्रभाव पडणार नाही, अशी स्पष्टता न्यायालयाने दिली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button