जाहिरात
आपला जिल्हा

जिल्ह्यात ४ नगरपरिषद सदस्य निवडणुकीला स्थगिती

सुधारित निवडणूक कार्यक्रम ४ डिसेंबरला घोषित होणार

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.१ डिसेंबर)

राज्य निवडणूक आयोगाच्या ४ नोव्हेंबर २०२५ च्या पत्रान्वये नगर परिषदांच्या सदस्य व अध्यक्ष पदासाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.
परंतु ज्या नगर परिषदा आणि नगर पंचायतीमध्ये ज्या जागेसाठी अपील दाखल होते, मात्र अपिलाचा निकाल संबंधित जिल्हा न्यायालयाकडून २२ नोव्हेंबर २०२५ नंतर म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२५ किंवा त्यानंतर देण्यात आला आहे, अशा नगर परिषदा व नगर पंचायतीच्या सदस्य पदाच्या त्या जागेच्या निवडणुका ४ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार घेण्यात येऊ नयेत. तसेच अशा प्रकरणात अध्यक्ष पदाचा समावेश असल्यास त्या संपूर्ण नगर परिषदेची निवडणूक स्थगित करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने २९ नोव्हेंबर २०२५ रोजी आदेशान्वये निर्देशित केले आहे.

सदर सूचनेनुसार गडचिरोली नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक १अ , ४ब आणि ११ब तसेच आरमोरी नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक १०अ या चार ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली असून येथील निवडणूक सुधारित कार्यक्रम नुसार घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कळविले.

चार जागांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम ४ डिसेंबरला घोषित करण्यात येणार आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button