जाहिरात
आपला जिल्हा

गडचिरोलीवरून मृतदेह स्वगावी पोहोचविण्यासाठी आमदार नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. ४ डिसेंबर)

सिरोंचा तालुक्यातील झिगांनूर येथील पोरिया पेंटा गावडे यांच्यावर गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले. निधनानंतर मृतदेह स्वगावी नेण्यासाठी गावडे कुटुंबियांपुढे गंभीर आर्थिक अडचण निर्माण झाली होती.

या परिस्थितीत गावडे कुटुंबियांनी सामाजिक कार्यकर्ते शिवराम पुल्लूरी यांना संपर्क साधून संपूर्ण घटना व आर्थिक अडचणींबद्दल सांगितले. माहिती मिळताच पुल्लूरी यांनी त्वरित आपल्या सहकाऱ्यांना मंगेश मल्लेलवार आणि अनिल तिडके यांना ही बाब कळवली.

सामाजिक बांधिलकी जपत या तिघांनी मिळून स्वखर्चाने खाजगी वाहनाची व्यवस्था करून मृतदेह झिगांनूर येथे आदरपूर्वक पोहोचविला.

या संवेदनशील आणि मानवतावादी कार्याबद्दल गावडे कुटुंबियांनी शिवराम पुल्लूरी, मंगेश मल्लेलवार आणि अनिल तिडके यांचे आभार मानले व समाधान व्यक्त केले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button