जाहिरात
महाराष्ट्र

मराठी पत्रकार परिषद उपाध्यक्षपदी अविनाश भांडेकर

Spread the love

लोकशाही न्युज, मुंबई (दि,२७ डिसेंबर):

मराठी पत्रकार परिषद केंद्रीय उपाध्यक्षपदी अविनाश भांडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मराठी पत्रकार परिषद ही ३ डिसेंबर १९३९ रोजी स्थापन झालेली देशातील मराठी पत्रकारांची सर्वात मोठी संघटना असून या संघटनेला आचार्य प्र. के. अत्रे यांच्यासारखे अनेक जेष्ठ साहित्यिकांचा वारसा लाभला आहे.८३ वर्षाचा इतिहास लाभलेली मराठी पत्रकार परिषद आहे.

मराठी पत्रकार परिषदेच्या नुकताच पुणे येथे झालेल्या बैठकीत उपाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. ऑगस्ट २०२६ पर्यत नवे उपाध्यक्ष कार्यरत असतील. विभागीय चिटणीस आणि उपाध्यक्षांनी विभागात संघटनात्मक काम वाढविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

सर्व नवीन उपाध्यक्षांचे एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई, डिजिटल मिडियाचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, राज्य प्रसिध्दीप्रमूख संदीप कुलकर्णी यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button