गडचिरोली : जिल्हाधिकारी म्हणून अविश्यांत पंडा यांनी स्वीकारला पदभार

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.२६ डिसेंम्बर)
गडचिरोली जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून अविश्यांत पंडा यांनी आज जिल्हाधिकारी संजय दैने यांचेकडून पदभार स्वीकारला. संजय दैने यांनी त्यांचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या.

अविश्यांत पंडा,गडचिरोली जिल्हाधिकारी
¶¶¶
अविश्यांत पंडा गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्याच्या सूचना विभाग प्रमुखांना दिल्या. गडचिरोली जिल्ह्यात विकास कामांसाठी मोठा वाव आहे. ही कामे करण्यासाठी मिळालेल्या संधीचा उपयोग करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे आणि भविष्यातील योजनांचे नियोजन करणे आवश्यक आहे, असे सांगून त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना टीम भावना जोपासून काम करण्याचे आवाहन केले.
अविश्यांत पंडा हे २०१७ च्या आयएएस बॅचचे अधिकारी असून यापूर्वी त्यांनी नंदुरबार येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी, अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच नागपूर येथे वस्त्रोद्योग आयुक्त म्हणून कार्य केले आहे.
