आपला जिल्हा
गडचिरोली : अविश्यांत पांडा नवे जिल्हाधिकारी, संजय दैने यांची नागपूर येथे बदली

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २४ डिसेंबर)
सरकारने राज्यातील काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून रूज होण्याचे आदेश अविश्यांत पांडा यांना दिले आहेत.अविश्यांत पांडा, आयुक्त वस्त्रोद्योग नागपूर यांची महाराष्ट्र शासनाने गडचिरोली चे नविन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. गडचिरोली चे जिल्हाधिकारी संजय दैने यांची शासनाने आयुक्त वस्त्रोद्योग नागपूर या पदावर नियुक्ती केली आहे.
गडचिरोलीचे नवे जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा हे २०१७ च्या तुकडीचे तेलंगणा कॅडरचे आयएएस ऑफिसर आहेत. नंतर त्यांची बदली महाराष्ट्र कॅडरमध्ये करण्यात आली होती.
अविश्यांत पांडा गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी काय योगदान देतात याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागलेले आहे.
जाहिरात
