जाहिरात
आपला जिल्हा

उदय धकाते व व्यंकटेश दुडमवार गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन “गामा” च्या संयोजकपदी

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि २९ डिसेंबर)

स्थानिक इंदिरा गांधी चौकातील दिनांक २९ डिसेंम्बर रविवार रोजी रेस्ट हाऊस येथे झालेल्या वार्षिक बैठकीत गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन “गामा” ची कार्यकारिणी गठीत करण्यात आली.संयोजकपदी उदय धकाते व व्यंकटेश दुडमवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नवीन नियुक्त झालेल्या संयोजकांना सर्व पत्रकारांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पत्रकारांनी नवीन निवड झालेल्या संयोजकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आताच्या घडीला झटपट बातमी पोहचविण्याचे माध्यम म्हणून डिजिटल मीडिया कडे बघितले जाते. कोणतीही घटना अथवा बातमी, घडामोडी झटपट ऑनलाईन प्रकाशित करून वाचकांपर्यंत पोहचविण्याचे काम डिजिटल मीडियातील पत्रकार तत्परतेने करित आहे. वाचक वर्गाचा सुद्धा ऑनलाईन न्यूज ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतांना दिसत असून वाचकांचा कलही वाढतांना दिसत आहे.
गडचिरोली ऑल  मीडिया असोसिएशन ही मागील तीन वर्षांपासून गडचिरोली शहरामध्ये कार्यरत आहे.

त्यांच्या निवडीबद्दल कार्यकारिणी सदस्य जयंत निमगडे (गडचिरोली वार्ता न्युज),अनिल बोदलकर (एविबी न्युज),किशोर खेवले (लोकप्रवाह न्युज) संतोष सुरपाम (संतोष भारत), निलेश सातपुते (लोकवृत्त), प्रवीण चनावार (वृत्तवाणी), यांनी अभिनंदन केले आहे.

पत्रकार परिषदांसाठी संपर्क
¶¶¶
१)उदय धकाते (९४२३४२२३२३)

२)व्यंकटेश दुडमवार (९४२२६२४४६६)

यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन “गामा” च्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button