गडचिरोली : उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोली दौरा
कोनसरीत विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,३१ डिसेंबर)
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नववर्ष २०२५ च्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारीला गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी ११ वाजता कोनसरी येथे पोहोचणार आहेत.
मुख्यमंत्रीपदी नव्याने विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोली जिल्ह्याचा पहिला दौरा असून जिल्ह्यात मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लॉयड्स मेटल्सच्या विविध उपक्रमांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणारे प्रकल्प
¶¶¶
लॉयड्स डीआरआय प्लांट,
लॉयड्स राज विद्या निकेतन (सीबीएसई शाळा),लॉयड्स काली अम्माल मेमोरिअल हॉस्पिटल,लॉयड्स वन्या क्लोदिंग कंपनी,फॅमिली क्वार्टर्स आणि पोलीस ऑफिसर्स फॅमिली क्वार्टर्स,जिमखाना आणि बालोद्यान या सोबत स्लरी पाईपलाईन, पेलेट प्लांट आणि आयरन ओर ग्राइंडिंग युनिटच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही होणार आहे.
