श्री शिवाजी महाविद्यालयात रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न

लोकशाही न्युज, चिखली (दि. ३१ डिसेंबर)
चिखली प्रतिनिधी – मेघा जाधव
स्थानिक चिखली येथील श्री. शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित श्री. शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयात डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२७ व्या जयंती उत्सवानिमित्त दि.२४ डिसेंबर २०२५ रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून डॉ.मीनल गावंडे,गृह अर्थशास्त्र विभागप्रमुख,स्व. भास्करराव शिंगणे कला,प्रा. नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालय,साखरखेर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाचे कौतुक केले. आणि त्यांनी विद्यार्थ्यांना अशाच प्रकारची उंच भरारी घ्यावी यासाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. प्रमोद आर.पडोळे हे उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात होणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेण्यास प्रोत्साहित केले.व विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांची स्तुती केली. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक डॉ. वनिता पोच्छी यांनी व्यक्तिमत्व विकासात स्पर्धांचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाकरिता रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.गजानन डोंगरे,कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा.दिलीप उन्हाळे,सांस्कृतिक कार्यकमाच्या प्रमुख डॉ. विजयश्री हेमके यांची उपस्थिती होती.या स्पर्धेसाठी विद्यार्थिनींचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.तसेच रांगोळी समितीच्या प्रमुख प्रा. तृप्ती श्रीरामे,सदस्य डॉ. सुनिता कलाखे,डॉ.शिल्पा देशमुख,प्रा.कोमल मापारी ह्या उपस्थित होते.या स्पर्धेचे परीक्षक डॉ मिनल देशमुख आणि प्रा.शालिनी काटोले यांनी रांगोळीचे परीक्षण केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.पुनम वैद्य तर आभार डॉ. सुनिता कलाखे यांनी केले.या कार्यक्रमासाठी श्री.रामदास भोंडे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
