जाहिरात
निधन वार्ता

सुमनजी शिवनाथजी कुंभारे यांचे वृद्धापकाळाने निधन

नागपूर येथे घेतला अखेरचा श्वास; उद्या कटानी नदी घाटावर अंत्यसंस्कार

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. ६ नोव्हेंबर २०२६)

गडचिरोली शहरातील सुपरिचित डॉक्टर स्वर्गीय शिवनाथजी कुंभारे यांच्या धर्मपत्नी व धनवंतरी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अनंता कुंभारे यांच्या मातोश्री सुमनजी शिवनाथ कुंभारे यांचे आज शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या पश्चात मुलगा डॉक्टर अनंता कुंभारे,सुन,तीन मुली, जावई व नातवंड तसेच बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने कुंभारे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गडचिरोली शहरात शोककळा पसरली आहे.

स्व. सुमनजी कुंभारे यांच्या पार्थिवावर उद्या शनिवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता कटानी नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

स्व. सुमनजी शिवनाथजी कुंभारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
!!
जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button