११ एप्रिल ला सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांचा करणार घेराव
जिल्हा कंत्राटदार संघटनेचा पत्रकार परिषदेतून इशारा
लोकशाही न्युज,गडचिरोली(दि. ३१ मार्च)
गडचिरोली जिल्हा कंत्राटदार संघटने कडून मागील महिन्यात करण्यात आलेल्या आंदोलना वरती शासन दरबारी कुठलाही निर्णय झालेला नसून येत्या ११ एप्रिल ला गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांना घेराव घालून सरकारचा निषेध करणार असल्याची माहिती आज दि. ३१ मार्च ला झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्हा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष अजय तुम्मावार यांनी दिलेली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील मागील वर्षीचे अकराशे पन्नास कोटी रुपये शिल्लक असून त्यापैकी केवळ ५० कोटी रुपये मंजूर झालेले असून उर्वरित अकराशे करोड सरकारकडे शिल्लक आहेत. त्यामुळे मिळालेल्या तुटपुंज्या पैशातून मजूराची मजुरी, घेतलेल्या मालाचे चुकारे, ड्रायव्हरचे पगार, बँकेतून घेतलेल्या कर्जाचे व्याज कशी परतफेड करायची असा गंभीर प्रश्न त्या कंत्राटदारांना निर्माण झाला आहे. उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा व्याज तरी बँकेने माफ करावा असे सुद्धा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कंत्राटदार संघटनेने व्यक्त केले आहे.
गडचिरोली जिल्ह्याला फक्त ५० कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे या मिळालेल्या तुटपुंज्या निधी अभावी कंत्राटदार समाधानी नसून कमीत कमी ५० टक्के रक्कम तरी देय अदा करावी अशी मागणी सुद्धा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
आज झालेल्या पत्रकार परिषदेला अजय तुम्मावार,अशोक लडके, राहुल निलमवार,अजय गोरे, मंगेश देशमुख, ,राजु मेहता, प्रसाद कवासे,अभिजित अंडलकर ,आनंद तोगरवार,सुशील पोरड्डीवार, सागर निंबोळकर, विकास किरमोरे,अशोक चलाख, बल्लाजी राठोड इतर सर्व कंत्राटदार उपस्थित होते.
