जाहिरात
आरमोरी

रामदास डोंगरवार यांची सेवा सहकारी संस्था कोजबीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

Spread the love

लोकशाही न्युज, आरमोरी (दि. २८ मार्च)

आरमोरी तालुक्यातील सेवा सहकारी संस्था कोजबी र. नं.२६४ ची अध्यक्ष उपाध्यक्ष ची निवड सभा समाज मंदिर कोजबी येथे आज दिनांक २६ मार्च २०२५ रोजी दुपारी ३ वाजता घेण्यात आली यात अध्यक्ष म्हणून रामदास डोंगरवार तर उपाध्यक्षपदी दिनेश बनकर यांची निवड सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली.

यापूर्वी १३ सदस्य संख्या असलेल्या सेवा सहकारी संस्था कोजबीच्या संचालकांचीही बिनविरोध निवड करण्यात आली होती. या सभेला १३ सदस्यांपैकी अकरा सदस्य उपस्थित होते त्यात मनोहर मूल्येवार, भगवान मोहिते, सुरेश दुमाने, सुनील ताडाम, कृपानंद सोनटक्के, बाबुराव मशाखेत्री, श्रीहरी बोरकर, मनोहर गेडाम, रसिका घुटके, रामदास डोंगरवार, दिनेश बनकर उपस्थित होते निवडणूक अधिकारी म्हणून आर.जी. उसेंडी तसेच संस्थेचे सचिव भास्कर हुमणे यांनी निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली.
संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष रामदास डोंगरवार उपाध्यक्ष दिनेश बनकर यांनी सर्व संचालकांचे आभार मानले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button