जाहिरात
ब्रेकिंग न्युज

गडचिरोली : न्यायाधीशाच्या पोलीसगार्ड ने स्वतःवर गोळ्या झाडल्या, उपचारादरम्यान मृत्यू

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,११ डिसेंबर)

गडचिरोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीशाच्या पोलीस गार्डने स्वतःच्या अंगावर गोळ्या झाडून आत्महत्याची केल्याची घटना आज दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात घडली.
मृतक पोलीस शिपायाचे नाव उमाजी केवळराम होळी वय-४६  असून मृतक पोलीस गार्ड हा रा. मोहटोला, बेळगाव ता. कोरची जि. गडचिरोली येथील रहिवासी होता.

प्राप्त माहितीनुसार घटनेचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे प्राथमिक माहितीनुसार वैयक्तिक किंवा मानसिक ताण-तणावामुळे ही घटना घडल्याचे बोलल्या जात आहे. न्यायालय प्रशासन व पोलीस विभागाने घटनेची दखल घेत तसा तपास सुरू केलेला आहे.

उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या पोलीस गार्डचे मृत शरीर शव विच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे नेण्यात आलेले असून पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button