जाहिरात
आपला जिल्हा

संतांनी सांगितलेला विज्ञानवाद अंगीकारा : अनुप कोहळे

अनंतपूर येथे संत जगनाडे महाराज यांची ४०० वी  जयंती साजरी

Spread the love

लोकशाही न्युज, चामोर्शी (दि,१० डिसेंबर)

चामोर्शी तालुक्यातील अंनतपूर येते संताजी स्नेही मंडळ अंनतपूर च्या वतीने श्री संत जगणाडे महाराज यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्ताने प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक म्हूणन जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते अनुप कोहळे उपस्थित होते.

२१ वा शतक हा विज्ञानाचा युग आहे, मात्र अजूनही समाजातील बहुसंख्य लोक अंधश्रद्धा पाडतात. संत महात्म्यांची जयंती ही फक्त मिरवण्यासाठी नसून त्यांनी सांगितलेल्या विचारांवर चालण्यासाठी आहे, ४०० वर्षा पूर्वी संतांनी जो विज्ञानवाद सांगतिला तोच चिकित्सक दृष्टीकोन व विज्ञानवाद आत्मसात करणे काळाची गरज आहे. श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा नको असे प्रतिपादन अनुप कोहळे यांनी आपल्या मार्गदर्शनिय भाषनातून केले.

या जयंती महोत्सवात विशेष अतिथी म्हूणन ग्रा. प. विसापूर चे उपसरपंच काशिनाथ बुरांडे, दिवाकर बारसागडे निमाडर ( टोला ), रोशन बारसागडे, बाळाराम दूधबावरे,  मारोति बुरांडे,  रविन्द्र नैताम, संतोष नरताम, मोरेश्वर वासेकर,  रमेश वासेकर,  रोहिदास बारसागडे  आदि मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान  तुलसीराम बुरांडे व गीरमाजी दुधबावरे यांचा मंडळ्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सौ.सरिता नैताम आशा सेविका अनंतपुर तर आभार प्रदर्शन  खोजेंद्र सातपुते यांनी मानले, कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी, महिला,  युवक  व इतर समज बांधव उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button