माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमानी साजरा

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि, १० डिसेंबर)
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचा १० डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला असून वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
रक्तदान शिबिर ,रुग्णांना फळ वाटप गडचिरोली येथे माणुसकीच्या घासअंतर्गत अन्नदान, मनोरुग्णांना ब्लॅंकेट चे वाटप, फळ वाटप यासारखे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
चामोर्शी येथे विविध कार्यक्रम
¶¶¶
चामोर्शी येथे माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांच्या वाढदिवस निमित्याने उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे रक्तदान शिबीर व रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. तसेच दत्तक परिवारातील कुटुंबीयांना अन्नधान्याच्या किटचे वितरण सुद्धा करण्यात आले.
गडचिरोली येथे विविध कार्यक्रम
¶¶¶
गडचिरोली येथे सकाळी मनोरुग्णला ब्लॅंकेट व चादर चे वितरण करण्यात आले तसेच बाल रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करून,व माणुसकीचा घास अंतर्गत अन्नदान करून डॉ. देवराव होळी माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष जिल्हा महामंत्री सौ योगिता पिपरे ,शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, महिला आघाडी शहराच्या अध्यक्ष कविता उरकुडे, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, ज्येष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, शहराचे महामंत्री विवेक बैस, शहराच्या उपाध्यक्ष स्वाती चंदणखेडे, देवाजी लाटकर, दलित आघाडीचे महामंत्री नामदेव काटवले, दलित आघाडीचे जिल्हा महामंत्री सिद्धार्थ नंदेश्वर, आदिवासी आघाडीचे विजय शेडमाके, रवी शुद्धलवार, युवा नेते सूरज मस्के, विलास मानकर ,आशिष भोपये, भास्कर भांडेकर, त्यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
