जाहिरात
आपला जिल्हा

आंबेशिवणीच्या जंगलात केली दोन वाघांची शिकार

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली( दि, २६ जुलै)

आसाम राज्यातील गुवाहाटी येथे महाराष्ट्रातील वाघांची तस्करी करणाऱ्या हरीयाणा राज्यातील बावरीया टोळीतील १६ जणांच्या मुसक्या आवळल्यानंतर वनविभागाने या प्रकरणाचा तपास तीव्र गतीने सुरू केला आहे. या टोळीतील करमचंद जगीरबाबू बावरी या आरोपीला तपास अधिकारी तथा सहायक वनसंरक्षक सोनल भडके व त्यांची चमू वाघांची प्रत्यक्ष शिकार केली.

त्या ठिकाणी गडचिरोली मुख्यालया पासून अवघ्या १५ किलोमीटर दूर वर असलेल्या आंबेशिवणीच्या जंगलात घेऊन गेले. आरोपी करमचंद याने दोन वाघांची शिकार केल्याचे सांगितले असून जंगलात जिथे सापळा लावला आणि वाघाचे मांस पुरले ती ठिकाणेही दाखवली.
वाघांची शिकार करण्यासाठी पंजाब, हरियाणा राज्यातून आलेल्या बावरीया टोळीतील १६ सदस्यांना वनाधिकाऱ्यांनी आंबेशिवणी गावालगतच्या झोपडीतून २२ जुलै रोजी मध्यरात्रीनंतर २ वाजताच्या सुमारास अटक केली होती.

यात सोनू सिंग रंजीत सिंग बागडी (वय२४) रा. मकवाल दशुवा जि. होशियारपूर (पंजाब), दिवानसिंग प्रभाती सिंग (वय ६५) रा. लुधियाना (पंजाब), राजू सिंग गोपी सिंग (वय ३२) रा. समालका मंडी रा. जि. पानीपत, हरीयाणा, पुजारी सिंग रामकुमार सिंग (वय २५) रा. ता. जि. होशियारपूर (पंजाब), करमचंद प्रकाश सिंग (वय २२) रा. कालका जि. पंचकुला (हरीयाणा), कविता सोनु सिंग (वय २०), रा. मकुवार जि. इसारपूर (पंजाब), सावित्री दिवान सिंग (वय ४५) रा. लुधियाना (पंजाब), मैना राजू सिंग (वय २१), रा. समालका जि. पानीपत (हरीयाणा), पूनम पुजारी बावरी (वय २०) रा. होशियारपूर (पंजाब), केसर ओमप्रकाश ( वय ५०) रा. पिंजोर जि. पंचफुला (हरीयाणा), करमचंद जगीरबाबू बावरी (वय ३०), रा. होशियारपूर (पंजाब), रूमाल सिंग प्रभू सिंग, (वय ४६), रा. समालका जि. पानीपत (हरीयाणा), रामभगत हरीसिंग (वय ३२) रा. बासगाव जि. हिसार (हरीयाणा) अशी या आरोपींची नावे आहेत.

त्यांना न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली वनविभागाचे सहायक वनसंरक्षक सोनल भडके, चातगावचे वनपरीक्षेत्र अधिकारी पडवे तसेच इतर वनकर्मचारी करत आहेत.

यातील करमचंद बावरी या आरोपीने दोन वाघ मारल्याचे सांगितले. त्याला आंबेशिवणीच्या जंगलात नेले असता वाघांसाठी कुठे सापळा लावला, वाघाला कसे मारले, कुठे त्याचे चामडे काढले, कुठे मांस पुरल्या ही सगळी ठिकाणे त्याने दाखवली. विशेष म्हणजे चौकशीदरम्यान या सर्व बाबींचे चित्रीकरण करण्यात आले आहे. यावेळी पोलिसांचे श्वान पथकही सोबत होते. त्याने दाखवलेल्या खड्ड्यात खोदून काही अवशेष जप्त करण्यात आले असून ते अधिक तपासणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास वनसंरक्षक रमेशकुमार यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button