जाहिरात
विधानसभा गडचिरोली

गडचिरोली: डॉ. देवराव होळी यांनी शुक्रवारला भरला नामांकन अर्ज

Spread the love

लोकशाही न्यूज, गडचिरोली (दि, २६ ऑक्टोबर)

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजपाने आपला अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. तरीही विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांनी शुक्रवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करत पक्षाचे एबी फॉर्म नसताना सुद्धा आपल्या भाजपातील अनेक पदाधिकारी व महायुतीतील मित्र पक्षाच्या हजेरीत आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे.
विशेष बाब म्हणजे २०१९ ला पक्षाने एबी फॉर्म देण्याच्या अगोदरच आपला अर्ज दाखल केला होता पण त्यावेळी त्यांना एबी फॉर्म मिळाल्याने पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली व ते पक्षाकडून लढले होते पण यावेळेस नक्की भाजपा पक्षश्रेष्ठी डॉ देवराव होळी यांना पक्षाची उमेदवारी देतो की नाकारतो याकडे लक्ष लागलेले आहे.

आपण मागील १० वर्षापासून  गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या केवळ विकासासाठी प्रयत्न करीत असून मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येणारी विकास कामे केलेली आहे. परंतु अजूनही मागास असलेल्या या जिल्ह्याचा मोठा प्रमाणावर विकास होण्याची आवश्यकता आहे त्याकरिता जनतेने मला पुन्हा या जिल्ह्याच्या विकासासाठी व जनतेच्या सेवेसाठी एकदा संधी द्यावी व पुन्हा आमदार म्हणून निवडून द्यावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली येथील महायुतीच्या महामेळाव्याप्रसंगी उपस्थित प्रचंड जन समुदायाला मार्गदर्शन करताना केले.

महायुतीच्या महामेळावाला गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून जनतेने प्रचंड गर्दी करून आमदार डॉक्टर देवराव होळी यांना आपले मोठे जनसमर्थन असल्याचे दाखवून दिले. ढोल ताशांच्या गजरात आदिवासी नृत्य व बैलबंडीच्या जोड्यांनी आजची भव्य मिरवणूक काढून आमदार डॉ. देवराव होळी यांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले. या भव्य रॅलीने संपूर्ण गडचिरोली भाजपमय झाल्याचे दिसून आले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button