जाहिरात
विधानसभा गडचिरोली

गडचिरोली: महायुती कडून आमदार डॉ. देवराव होळी यांनाच उमेदवारी द्यावी

शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेतून मागणी

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२२ऑक्टोबर)

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून २०१४ व २०१९ ला झालेल्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय मिळवणारे भाजपा चे डॉ. देवराव होळी यांनाच २०२४ ला होऊ घातलेल्या विधानसभेत गडचिरोली मधून महायुतीने उमेदवारी द्यावी.अशी मागणी गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या वतीने आयोजित हॉटेल वैभव येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार होळी मित्रपरिवारातील नेत्यांनी ही मागणी केलेली आली.

दि.२५ ऑक्टोबरला भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार डॉ.देवराव होळी मित्रपरिवार व समर्थकांचा, कार्यकर्त्यांचा मेळावा अभिनव लॉन येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सुद्धा या पत्रकार परिषदेतून देण्यात आली.

आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्याप्रमाणेच कोठगल बॅरेज सिंचन योजना यासारखे अनेक विकास कामे केलीत अशी विकासदृष्टी असणाऱ्या आमदार डॉ. देवराव होळी यांनाच भाजपाने येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत गडचिरोली येथून उमेदवार म्हणून घोषणा करावी अशी मागणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली.

आज झालेल्या पत्रकार परिषदेला हेमंत जम्बेवार अध्यक्ष शिवसेना (शिंदे गट) राकेश बेलसरे, मुक्तेश्वर काटवे भाजपा शहराध्यक्ष, विलास दशमुखे माजी सभापती, विलास निखारे सरपंच, नीता वडेट्टीवार योगिता पिपरे, लौकिक भिवापुरे यासह अनेक भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button