जाहिरात
आपला जिल्हाभामरागड

कोपर्शीच्या जंगलात पोलीस नक्षल चकमक,५ नक्षली ठार

Spread the love

लोकशाही न्युज,भामरागड (दि,२१ ऑक्टोबर)

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकी च्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये विध्वंसक कारवाया करून घातपात घडविण्याच्या उद्देशाने मागील दोन दिवसापासून काही नक्षलवादी एकत्र येऊन कट रचनेच्या तयारीत असून ते गडचिरोली महाराष्ट्र व नारायणपूर छत्तीसगड सीमेलगत असलेल्या कोपर्शी तालुका भामरागड जंगल परिसरात दबा धरून बसण्याची गोपनीय माहिती मिळाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अभियान यतीश देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन  एम .रमेश यांचे नेतृत्वात सी ६० पथकाच्या २२ तुकड्या व सीआरपीएफ च्या QAT च्या २ तुकड्या या कोपर्शी जंगल परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी माओवाद विरोधी अभियान राबविण्या करिता रवाना करण्यात आल्या.

सदर जंगल परिसरात पोहोचताच नक्षलवाद्यांनी पोलीस पथकाच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली.यावेळी पोलीस पथकाकडून माओवाद्यांना शस्त्र खाली टाकून शरण येण्याचे आवाहन करण्यात आले परंतु नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार सुरू ठेवला.

सदर गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पोलीस पथकाकडून दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार करावा लागला या अभियानात ५ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले झाले. जंगल परिसरात शोधमोहीम सुरू आहे असून मृत नक्षलवाद्याची त्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button