जाहिरात
राजकीय

गडचिरोली: “शेकाप” व आझाद समाज पक्षाची आघाडी

विधानसभा निवडणूक एकत्र लढणार

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,२१ ऑक्टोबर)

गडचिरोली आणि अहेरी विधानसभा स्वबळावर लढणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाबरोबर आता खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पक्ष ( कांशीराम) यांची स्थानिक आघाडी जाहिर करण्यात आली.

आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली शहरात पार पडलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमात शेकडो आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या स्थानिक आघाडीची घोषणा करण्यात आली. यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते, भाई शामसुंदर उराडे, भाई अक्षय कोसनकर, आझाद समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी धर्मानंद मेश्राम, कार्याध्यक्ष विनोद मडावी, महासचिव पुरुषोत्तम रामटेके, राहुल उराडे, आरमोरी विधानसभा अध्यक्ष ॠषी सहारे, समविचारी मित्र पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, काॅ. विनोद झोडगे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकरी कामगार पक्षातर्फे गडचिरोली विधानसभेकरीता जयश्रीताई जराते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली असून लवकरच खदानविरोधी मुद्यावर शेकाप अहेरी विधानसभेचा उमेदवार जाहीर करणार असून आझाद समाज पक्षही आरमोरी विधानसभेच्या रिंगणात आपला उमेदवार उतरवणार आहे. त्यामुळे इतर समविचारी पक्षांसह शेतकरी कामगार पक्ष आणि आझाद समाज पक्ष आता स्थानिक आघाडी करुन जिल्ह्यातील तीनही जागा लढणार आहेत.

या आघाडीच्या अहेरी, गडचिरोली, आरमोरी विधानसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार चंद्रशेखर आझाद आणि भाई जयंत पाटील यांच्या संयुक्त जाहीरसभाही होणार आहेत. एवढेच नव्हे तर येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेच्या निवडणूकाही हे पक्ष एकत्र लढून प्रस्थापित काॅंग्रेस – भाजपला आव्हान देणार असल्याची माहिती भाई रामदास जराते, भाई शामसुंदर उराडे, धर्मानंद मेश्राम, राज बन्सोड, विनोद मडावी यांनी दिली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button