जाहिरात
चंद्रपूर

चंद्रपूर येथील महाकाली महोत्सवात डॉ. जयश्री देवगडे यांचा सत्कार

Spread the love

लोकशाही न्युज, चंद्रपूर (दि,१३ ऑक्टोबर)

चंद्रपूर येथे दि. ०७ ते ११ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत मागिल वर्षांपासून महाकाली महोत्सव, आमदार  किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत असून, या वर्षी सुद्धा महाकाली महोत्सव साजरा करण्यात येत असून या महोत्सवात शैक्षणिक, सामाजिक राजकीय, व्यावसायिक, समाजसेवक आणि विविध क्षेत्रातील कलागुण संपन्न व्यक्तींचा तेथील आयोजक विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात येतो.

गडचिरोली शहरातील एक नामांकित डॉक्टर ज्यांनी जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने गडचिरोली शहरात स्वतःचे भव्य प्राईम हाॅस्पिटल उभे करून आपल्या उपचाराने अल्पावधीतच नांव लौकिक मिळविले त्या बद्दल चंद्रपूर शहरात आयोजित महाकाली महोत्सवात डॉ जयश्री देवगडे यांचा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आणि पुढील भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच त्यांच्या पेशाबद्दल खुप कौतुक करण्यात आले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button