गडचिरोली: आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते विविध विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि, १२ ऑक्टोबर)
गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या विशेष प्रयत्नातून गडचिरोली शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यात आली तर काही प्रगतीपथावर असून काही मंजूर झालेली आहेत यातील झालेल्या कामांचे लोकार्पण व मंजूर कामांचे भूमिपूजन करण्याचा सोहळा आमदार डॉ. देवराव होळी यांच्या उपस्थित गडचिरोलीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी गडचिरोली शहरातील मुख्य चौकामध्ये चारही बाजूंना गडचिरोली शहरातील झालेल्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले त्यानंतर प्रत्यक्ष प्रभागांमध्ये जाऊन शहरातील सर्व प्रभागातील कामांचे भूमिपूजन व लोकार्पण ढोल ताशांच्या गजरात करण्यात आला.
यावेळी विधानसभेचे प्रमुख प्रमोद पिपरे, भाजपाचे ज्येष्ठ नेते रमेश भूरसे, जिल्ह्याच्या महामंत्री योगिता पिपरे, शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, पंचायत समिती माजी सभापती मारोतराव इचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हेमंत बोरकुटे, महिला आघाडीचे अध्यक्ष कविता ऊरकुडे, ज्येष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, लताताई लाटकर, नीता उंदीरवाडे, जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या महामंत्री त्रिशा डोइजड, स्वाती चंदनखेडे, पुनम हेमके, तालुका महामंत्री बंडू झाडे, शहराचे महामंत्री नरेश हजारे, विनोद देवोजवार, विवेकसिंग बैस,, केशव निंबोड, सचिन येनप्रेड्डीवार, विलास नैताम, राजू शेरकी, श्याम वाढई, यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गडचिरोली शहरातील ५७० कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. यामध्ये मुख्यतः गडचिरोली नगरपरिषद क्षेत्रात भूमिगत गटार योजना १०५ कोटी,नगरपरिषद वाढीव पाणीपुरवठा योजना १३२ कोटी, ओपन स्पेसचे सौंदर्यकरण व पांदन रस्ते ५० कोटी,नगरोत्थान योजनेअंतर्गत रस्ते व नाली बांधकाम ४५ कोटी, गडचिरोली शहरात प्रमुख रस्ते ७४ कोटी, गडचिरोली नगरपरिषद आठवडी बाजार गाळे बांधकाम ३ कोटी, विसापूर येथे पाणीपुरवठा योजना ३ कोटी, गडचिरोली येथे बस स्थानक व व विभागीय कार्यालय बांधकाम १३ कोटी, नगरपरिषद गडचिरोली येथे जिल्हा क्रीडांगण ४७ कोटी, गडचिरोली येथे आरटीओ भवनासाठी २५ कोटी, गडचिरोली बीएससी महाविद्यालय वसतिगृह बांधकाम १५ कोटी, गडचिरोली येथे तहसील कार्यालय प्रशासकीय इमारत १८ कोटी, गडचिरोली येथे नियोजन भवन २५ कोटी, वाढीव महिला व बाल रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण सार्वजनिक बांधकाम विभाग नवीन इमारतीचे बांधकामासह विविध कामांचा समावेश आहे.
