जाहिरात
आपला जिल्हाराजकीय

गडचिरोली: ९ ऑक्टोबर ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दूरदृश्य प्रणाली द्वारे पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ सोहळा

आमदार डॉ. देवराव होळी यांनी मानले राज्य व केंद्र सरकारचे आभार

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. ५ ऑक्टोंबर)

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे हे त्यांचे स्वप्न साकार झाले आहे. येत्या ९ ऑक्टोबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शासकीय महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा दूरदृश्य प्रणाली द्वारे संपन्न होणार आहे.

गडचिरोली येथे शासकीय महाविद्यालय व्हावे यासाठी आमदार डॉ.देवराव होळी यांनी  अथक प्रयत्न केले. तात्कालीन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना घेराव  घातला. महायुतीचे सरकार आल्याबरोबर पहिल्याच प्रवासामध्ये आमदार डॉ. देवराव होळी यांच्या मागणीच्या प्रभावाने गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करीत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.  यामुळे या महाविद्यालयाच्या कामाला गती आली. अखेर या महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते होणार आहे . त्यामुळे गडचिरोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे हे आमदार डॉ. देवराव होळी यांचे स्वप्न साकार होत आहे. याबद्दल आमदार डॉ. देवराव होळी यांनी केंद्र व राज्य सरकारचे आभार मानले व यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी अभिनंदन केले.

गडचिरोली जिल्ह्याला महाविद्यालय मिळवून देणारे आमदार डॉ. देवराव होळी यांचे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button