जाहिरात
आपला जिल्हा

उद्या लाडक्या बहिणींचा भव्य मेळावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस साधणार संवाद

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,१७ ऑगष्ट)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी बहिणींचा उद्या दिनांक १८ ऑगस्ट ला ठीक दुपारी ३ वा गडचिरोली येथील अभिनव लॉन या ठिकाणी भव्य मेळावा होणार व त्या मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गडचिरोली चे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस संवाद साधणार आहेत कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती आमदार परिणय फुके यांची असणार आहे.

या कार्यक्रमाला गडचिरोली, धानोरा, चामोर्शी या तालुक्यातील सर्व महिला भगिनी सर्व महिला सरपंच लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ज्यांना लाभ मिळाला नाही अशांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रित केलेले आहे. जे लाभार्थी वंचित राहिले त्यांचे फॉर्म भरून दिल्या जाणार तसेच ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांचाही पाठपुरावा घेणार आहेत थेट संवाद साधताना अनेक लाभार्थी लाडकी बहीण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संवाद साधणार आहेत.

अशी माहिती भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, तसेच भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गीता हिंगे, भाजपा आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉक्टर मिलिंद नरोटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, प्रदेश महिला आघाडी सदस्य रेखाताई डोळस, युवामोर्चा युवती प्रमुख पायल कोडापे यांनी दिली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button