
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१८ ऑगष्ट)
कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थी व नवनियुक्त पोलिस व अधिकारी नियुक्त झालेल्यांचा सत्कार समारंभ
कुणबी समाज बांधव व आमदार डॉ. देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने २२ ऑगस्ट ला सेलिब्रेशन (फंक्शन) हॉल चामोर्शी रोड गडचिरोली येथे दुपारी २ वाजता कुणबी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला कुणबी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कुणबी समाज बांधव व आमदार डॉ. देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
कुणबी समाज बांधवांच्या वतीने गडचिरोली येथील विश्रामगृहात या मेळाव्याच्या नियोजना संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला आमदार डॉ. देवराव होळी, जगदीश पाटील मस्के, रामरतन गोहणे, कविता उरकुडे , घनश्याम म्हस्के, अर्चना बोरकुटे, अनुरथ निलेकार, वासुदेव बट्टे, राजू खंगार, हेमंत बोरकुटे ,प्रशांत कोटगले, मनोज उरकुडे, सुधाकर बाबनवाडे, हेमंत बानबले ,रुपेश चुधरी, सुषमाताई डोईजड, दिलीप मस्के, यांचेसह समाज बांधव उपस्थित होते.
