आपला जिल्हाराजकीय
कोठरी येथे होणाऱ्या बौद्ध समाज मेळाव्याला हजर रहावे,आमदार डॉ. देवराव होळी

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,१७ ऑगष्ट)
बौद्ध समाज बांधव व आमदार डॉ. देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने १८ ऑगस्टला सकाळी ११ वाजता “बौद्ध समाज मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे. या बौद्ध समाज मेळाव्याला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बौद्ध बांधव व आमदार डॉ. देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
आमदार डॉ. देवराव होळी यांनी कोठरी परिसरात विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामांचे भूमिपूजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला अधिकाधिक समाज बांधवांनी मोठ्या उपस्थित राहावे असे आवाहन या करण्यात आले आहे.
जाहिरात
