४ जुन ला गडचिरोलीत रहदारीसाठी मार्गात बदल

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,३ जुन)
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनाकडुन आवाहन करण्यात येत आहे की, सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने गडचिरोली-चिमुर (१२) लोकसभा मतदार संघातील मतमोजनीची प्रक्रिया दि. ४ जून २०२४ रोजी कृषी महाविदयालय (अॅग्रीकल्चर कॉलेज) सोनापुर कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे पार पडणार आहे. सदर मतमोजनी चे ठिकाण गडचिरोली-चंद्रपुर राष्ट्रीय महामार्गालगत असल्यामुळे मतमोजनी प्रक्रियेदरम्यान उमेदवार व पक्षातील कार्यकर्ते मोठया संख्येने येण्याची शक्यता आहे. मतमोजनी दरम्यान सदर महामार्गावर वाहतुक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावर उपाययोजना म्हणुन सदर महामार्गावरील वाहतुक दि.४ जुन २०२४ चे सकाळी ५ ते रात्री १२ वाजे पर्यंत बंद करण्यात येत आहेे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या रहदारीसाठी सदर मार्ग बंद राहणार आहे. याची सर्व नागरिकांनी दखल घ्यावी व कोणीही या मार्गाचा वापर करु नये.
पर्यायी वाहतुक मार्ग व्यवस्था पुढील प्रमाणे करण्यात येत आहे.
१) जड वाहने – इंदिरा गांधी चौक – चामोर्शी रोड – सेमाना देवस्थान – आंनदानगर कॉलनी– कोर्ट चौक – चंद्रपुर रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.
2) हलके वाहने – आय.टी.आय चौक – एल.आय.सी. चौक – मा.सी.ई.ओ. बंगला चौक- शासकिय विश्राम गृह (सर्कीट हाउस) –जिल्हा सामान्य रुग्णालय मार्गे चंद्रपुर रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.
मतमोजनीसाठी येणाऱ्या उमेदवार व पक्षांचे कार्यकर्त्यांच्या वाहनाच्या पार्किंगची सोय जिल्हा परिषद च्या खुल्या मैदानात केलेली आहे. तरी याबाबत सर्वांनी नोंद घ्यावी.
