जाहिरात
ताज्या घडामोडी

काँग्रेस चे डॉ.नामदेव किरसान यांचा एकतर्फी विजय

भाजपा चे खासदार अशोक नेते यांचा दारुण पराभव

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,४ जुन)

लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये आज झालेल्या ४ जून रोजी झालेल्या मतगणनेच्या दिवशी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र येथे महाविकास आघाडी चे उमेदवार डॉ. नामदेव किरसान हे १ लाख ४१ हजार ६९६ मतांनी विजयी झालेले आहेत.

डॉ नामदेव किरसान यांनी महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांचा जवळपास १ लाख ४१ हजार ६९६ मतांनी पराभव केलेला आहे.

आज झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच मतांची आघाडी घेतलेल्या नामदेव किरसान यांनी कुठेही पिछाडी झाली नाही व जवळपास पूर्ण मतमोजणी च्या फेऱ्या पूर्ण होत पर्यंत आपले मताधिक्य कायम ठेवले.व आपला विजय पूर्ण केला.

कार्यकर्त्यांच्या जल्लोष व विजयी रॅली
¶¶
गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातून डॉ.नामदेव किरसान हे विजय झाल्याने क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गडचिरोली शहरात भव्य फटाक्यांची आतिषबाजी व रॅली काढून जल्लोष साजरा केला.

गडचिरोली भाजपा कार्यालयात शुकशुकाट
¶¶
रोज गजबजलेल्या भारतीय जनता पार्टीच्या चामोर्शी रोडवरील कार्यालयात आज अशोक नेतेंच्या दारुण पराभवाने झाल्याने शुकशुकाट पसरला होता.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button