नेत्यांनो “त्या” महिलांना रोजगार द्या

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२२ एप्रिल)
लोकसभा निवडणुकीतील नुकत्याच१९ एप्रिल ला गडचिरोली-चिमूर क्षेत्रातील पहिल्या टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये नेत्यांनी ज्या महिलांना आपल्या निवडणूक अर्ज भरण्यासाठी,सभेसाठी,वा कोणती स्टार प्रचारक गावात आली म्हणजेच गर्दी करण्यासाठी ज्या महिलांना रोजगार दिला त्या महिलांना नियमित साठी रोजगार उपलब्ध करावा अशी मागणी गडचिरोली शहरवासीयांकडून होत आहे.
गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात गडचिरोलीमध्ये कुठलाही मोठा नेता आला तर ज्या राजकीय नेत्यांनी आपल्या स्वार्थासाठी आपल्या सभा मंडपात गर्दी दिसावी याकरिता पक्ष पदाधिकारी वा कार्यकर्त्यांच्या मदतीने वार्डा-वार्डातील गरीब व गरजू महिलांना २०० ते ३०० रुपये रोज देऊन सतत आठ-दहा दिवस रोजंदारी दिली व पक्ष्याचा चा झेंडा हातात दिला त्या महिलांना नेहमी करिता रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गडचिरोली तुन होत आहे.
ज्या महिलांना लोकसभा निवडणुकीत पक्षाचा झेंडा हातात घेऊन मिरवणूकीत उष्णतेचा पारा चाळीशी पार असताना सुद्धा फिरविण्यात आले त्या महिला आजही त्या राजकीय नेत्यांना व पक्षात एकनिष्ठ काम करणाऱ्या व पांढरे कपडे लावून फिरणाऱ्या कार्यकर्त्याकडे रोजगारासाठी मोट्या आशेने विनवणी करत आहेत साहेब आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्या.
