जाहिरात
संपादकीय

“आयएएस” अधिकारी वैभव वाघमारे च्या नावाची जनमानसात चर्चा तर जिल्ह्यतील कामचुकार कर्मचारी मोडतात बोटे

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली(दि,३० ऑगष्ट)
संपादक: संदिप कांबळे

महाराष्ट्र राज्यातील अगदी टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात वैभव वाघमारे ‘आयएएस’ अधिकारी सहाय्यक जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी म्हणुन नव्यानेच दाखल झाल्याने ते काय कामगिरी करतात याकडे जनतेचे कुतूहलाने लक्ष लागले होते. ते रुजू झाल्यापासून अगदी महिनाभरातच आपण काम करीत असलेल्या कार्यालयाला असा जो दणका दिला की संपूर्ण त्या दणक्याने महाराष्ट्र हादरून गेलेला आहे.

अहेरी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कामचुकार कर्मचाऱ्याच्या विरोधात कारवाई करून कर्तव्यात कसूर व शिस्त भंगाची कारवाई केलेली आहे. त्यांच्या या अशा कारवाईने काम करणारा कर्मचारी वर्ग खूप आनंदी झालेला आहे तर काम चुकार कर्मचारी त्यांच्या नावाने बोटे मोडत आहेत.

मागील काही वर्षात शासनाने आठवड्याचे कामकाज पाच दिवसाचे केले असल्याने कर्मचाऱ्याला आपल्या कार्यालयात ठराविक वेळात सकाळी ०९:४५ ला कार्यालयात हजर व्हावे लागते तर सायंकाळी ०६:१५ ला काम आटोपून कार्यालयातून बाहेर पडावे लागते.

गडचिरोली जिल्ह्याचे ठिकाण असल्याने अनेक शासकीय कार्यालयात त्यांच्या या कारवाईने धडकी घेऊन कर्मचारी कार्यालयात अगदी वेळेवर येतात व सुट्टी होईस्तोवर थांबतात ही बाब उल्लेखनीय झालेली आहे. आयएएस वैभव वाघमारे सारख्या कर्तव्य निष्ठ अधिकाऱ्या प्रमाणे जर गडचिरोली जिल्ह्यातील इतर आयएएस वर्ग काम करू लागला किंवा त्यांच्या तोडीस काम करण्याचा जरी प्रयत्न केला तरी कामचुकार कर्मचारी यांच्या कडुन चांगल्या प्रकारे काम करून घेऊ शकतात,  जेणेकरून जनतेचे कामे वेळेवर व मुदतीत करता येतील असा आशावाद आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button