जमीन अधिग्रहण विरोधात शेतकऱ्यांचा बैल-बंडी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. ५ जून)
गडचिरोली तालुक्यातील हिरापूर, गुरुवळा, राखी, आणि शिरपूरचक येथे प्रस्तावित विमानतळाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसी करीता भेंडाळा परिसरातील १४ गावांनीही शेतजमिनी देण्यास नकार दिला आहे. तसेच चामोर्शी तालुक्यातील जयरामपूर परिसरातील आणखी १३ गावांच्या जमीन अधिग्रहणासंदर्भात शासनाने आदेश दिले आहे.
या धोरणाच्या निषेधार्थ यापूर्वी जीआरची होळी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन, धरणे आंदोलन तसेच निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, शासन शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्यास तयार नाही.
जिल्ह्यातील सुपीक शेतजमिनींचे अधिग्रहण थांबवून पर्यायी जागांचा वापर करण्यात यावा, या मागणीसाठी ४ जून २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आले आंदोलनात संबंधित गावातील हजारो शेतकरी बांधव आपल्याला परिवारासह बैलबंडी व संपूर्ण शिधा पाणी घेऊन महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलनावर बसले आहेत.
जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत या आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार शेतकरी बांधवांनी घेतला आहे.
विविध राजकीय पक्षाचा पाठिंबा
!!
या आंदोलनात काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी सह तेली समाज कुणबी समाज कलार समाज मुस्लिम समाज बांधव डॉक्टर असोसिएशन व इतरही सामाजिक संस्था संघटना व समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्यात आलेला आहे.
पहिल्या दिवशी चर्चा निष्फळ
!!
जिल्हा प्रशासनातर्फे दिवसभरात तीन वेळा अधिकारी आंदोलन स्थळी आले त्यांनी चर्चेसाठी शिष्टमंडळ पाठवा अशी विनंती केली मात्र महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी बंद द्वार नव्हे तर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसमोर येऊन चर्चा करावी आणि केवळ कोरडे आश्वासन नाही तर लेखी द्यावे. अशी भूमिका घेतली.
रात्रभर शेतकरी रस्त्यावरच मुक्कामी
!!
जमीन अधिग्रहणाच्या विरोधात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया पुढे दिवसभर आंदोलन केले तसेच रात्रीही आपला मुक्काम जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील खुल्या रस्त्यावरच ठोकला. शेतकरी आपल्या परिवारासह आंदोलन थोडी पोहचले आहेत.
