जाहिरात
गडचिरोली

डोंगरगाव तंटामुक्त समितीने लावून दिला प्रेमीयुगलांचा आंतर जातीय विवाह

Spread the love

डोंगरगाव (दि २९ मे):-                                             कित्येक वर्षापासून प्रेम करणाऱ्या प्रेमियुगलांची विवाह करून संसार थाटण्याची इच्छा होती.
मात्र मुलीच्या कुटुंबीयांकडून लग्नाला विरोध असल्याने तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत या प्रेमियुगलांचा विवाह लावून दिला.
गडचिरोली तालुक्यातील डोंगरगाव येथील बाल्या परशुराम रोहनकर यांचे गावातीलच तृप्ती संजय गोहणे या मुलीसोबत अनेक वर्षापासून प्रेमसंबंध सुरू होते.
रितीरिवाजाप्रमाणे आपण लग्न करून आपला संसार थाटावा, अशी त्यांची इच्छा होती.
परंतु मुलीच्या कुटुंबीयाकडून आंतर जातीय लग्नाला विरोध होता.
प्रेमयुगलानी शेवटी तंटामुक्त समितीकडे धाव घेऊन आपली आपबीती सांगितली.
समितीने पुढाकार घेऊन दोघांचे वय नियमानुसार योग्य आहे काय..? याकरिता कागदपत्राची शहानिशा केली व दोघांचीही विचारपूस करून दोघांच्याही सहमतीने महात्मा गांधी तंटामुक्तच्या माध्यमातून रविवारी दुपारच्या सुमारास हनुमान मंदिरच्या आवारामध्ये आंतर जातीय विवाह लावून देण्यात आले.
यावेळी तंमुस अध्यक्ष देवेद्र बांबोळे, पोलीस पाटील पंडित मेश्राम, सरपंच अश्विनी सोदूरवार,ग्रामपंचायत सदस्य नेपाळ माध्यमवार,ग्रामपंचायत सदस्य दिपक बोलीवार,सदस्य रुपेश चुधरी,देवलता कोसनकर व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button