जाहिरात
राजकीय

योगिता पिपरे यांनी घेतला नगराध्यक्ष पदाचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.२१ नोव्हेंबर)

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष अर्ज योगिता पिपरे यांनी दि.१७ नोव्हेंबर रोजी अर्ज सादर केला होता.पण भारतीय जनता पार्टीने अगदी वेळेवर प्रणोती निंबोरकर यांना पक्षाची उमेदवारी दिली होती. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटला दिवस होता.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नगरपरिषद मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांच्या समोर योगिता पिपरे यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा अपक्ष उमेदवारी अर्ज आज मागे घेत नगराध्यक्षाच्या पदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्या. त्या प्रभाग क्रमांक ३ इंदिरानगर येथून नगरसेवक पदाची निवडणूक लढणार आहेत.

नामनिर्देशन मागे घेताना माजी नगरसेवक प्रमोद पिपरे, लोकसभा समन्वयक बाबूराव कोहळे, नगर परिषद निवडणूक प्रभारी वैभव पिपरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पक्षातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी योगिता पिपरे यांच्या निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत करत त्यांना यशस्वी भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या.

नगर परिषद गडचिरोली च्या नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आता केवळ ७ उमेदवार उरले आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button