गडचिरोलीताज्या घडामोडी
करंट लागून विद्युत कर्मचारी ठार

लोकशाही न्युज, गडचिरोली(दि,४फेब्रुवारी)
गडचिरोली शहरातील चामोर्शी रोड वरील गव्हर्मेंट हायस्कूलच्या बाजूला असलेल्या डीपीवर विद्युत कर्मचारी काम करीत असताना अचानक लागलेल्या विद्युत करंटने त्याचा पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली आहे. मृत्यू पावलेल्या विद्युत कर्मचाऱ्यांचे नाव जितेंद्र वसंतराव गजलवार वय ३५ वर्ष असून रा. बोदली हिरापूर जि. चंद्रपूर येथील रहिवासी आहे. त्याच्या मृत्यू पश्चात पत्नी, मुलगा, आई वडील व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
जितेंद्र हा आईवडिलांना कमावता एकुलता एक मुलगा असल्याने कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. घटनास्थळावर पोलिस दाखल होऊन पंचनामा केला असून शव उत्तरीय तपासणी करिता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे नेण्यात आले आहे.
जाहिरात
