जाहिरात
आपला जिल्हा

वैभव वाघमारे यांना पुढील वाटचालीसाठी संतोष ताटीकोंडावार यांनी दिल्या शुभेच्छा

मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वाशिम येथे नियुक्ती

Spread the love

लोकशाही न्युज,अहेरी (दि,३ फेब्रुवारी)

अहेरी येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांचे वाशीम जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांची प्रकल्प कार्यालय येथे भेट घेऊन सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

उपविभागीय अधिकारी व प्रकल्प अधिकारी म्हणून वैभव वाघमारे यांनी जवळपास ६ महिने कामकाज सांभाळली.या दरम्यान त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या कामांना प्रथम प्राधान्य देत विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती जनते पर्यंत पोहोचविली.

अल्प कालावधीतच त्यांची नियुक्ती वाशीम जिल्ह्यात करण्यात आली असून आता त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी संपूर्ण जिल्हा सांभाळायचा आहे.अहेरी सारख्या अतिदुर्गम भागात केलेल्या कामाचा अनुभव त्यांना वाशीम जिल्यात कामी येणार असून नक्कीच याही जिल्ह्यात ते उत्तम अशी कामगिरी करतील आणि जनतेचे प्रश्न सोडवतील असा आशावाद व्यक्त करून त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button