४ फेब्रुवारी ला गव्हर्नमेंट हायस्कुल शाळेचा अमृत महोत्सव

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,१ फेब्रुवारी)
गव्हर्नमेंट हायस्कुल, गडचिरोली ला ७५ वर्ष पूर्ण झाल्याने अमृत महोत्सव ४ फेब्रुवारी २०२४ ला होणार आहे.या शाळेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याने माजी विद्यार्थी एकत्र येऊन अमृत महोत्सव साजरा करणार आहेत.
अमृत्त महोत्सव ४ फेब्रुवारी २०२४ ला सकाळी ८ ते ६ वाजेपर्यंत शाळेत आयोजित केला आहे.
या कार्यक्रम करिता सर्व माजी विद्यार्थी – विद्यार्थिनी यांना सहपरिवार सहभागी होणार असून मित्र आणि मैत्रिणी च्या भेट आनंद घेणार आहेत. या शाळेतुन शिक्षण घेतलेले १८ ते ८२ वर्षा पर्यंत चे शेकडो माजी विद्यार्थी- विद्यार्थीनी बाहेर गावाहून येऊन अमृत महोत्सव मध्ये सहभागी होणार आहे.
४ फेब्रुवारी ला सकाळी माजी विद्यार्थ्यांची गडचिरोली शहरातून प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. बाहेर गावाहून येणाऱ्या आपल्या बांधव भगिनींना पूर्वीचा गडचिरोली व आताची गडचिरोली यांची माहिती होईल.
माजी शिक्षकांना व कर्मचारी यांना या कार्यक्रम मध्ये खास निमंत्रण देण्यात येत आहे. व त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.जे विद्यार्थी सोशल मीडिया चा वापर करीत नाही असे अनेक गरीब परिस्थिती मध्ये आहे त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या कार्यक्रममध्ये १२०० ते १५०० च्या वर उपस्थिती असेल.या महोत्सव मध्ये विदेशात असलेले माजी विद्यार्थी सुद्धा येणार आहेत.या महोत्सव चे आयोजक उदय धकाते, विक्रम ब्राम्हणवाडे, राजेश निखारे,दिलीप म्यॅकलवार, निलेश दंडवते, प्रभाकर धोटे, समीर कडीवाल, रवी सूर्यवंशी, संजय हजारे, सुनील पेंदोरकर, हेमंत बोबाटे, गीता मंगरे – ठाकरे, विद्या कवठे, प्रशांत नैताम, नितीन उदार, किरण पंधरे, डॉ. देवेंद्र मुनघाटे, सुरेखा न्यालेवार- घुमारे, शालिनीताई कुमरे-निंबारते अविनाश धाईत, प्रकाश पंधरे, उमेश अलाम आदींनी केले आहे.
