गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन (गामा)च्या वतीने खासदार अशोक नेते यांचा सत्कार

लोकशाही न्युज गडचिरोली (दि,३१ जानेवारी)
७ व्या युवा संसदेत गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांचा ‘आदर्श खासदार’ म्हणून सन्मान पुण्यात जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्स वतीने करण्यात आला, त्या मिळालेल्या सत्कारानिमित्य गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन ने त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
खासदार अशोक नेते यांच्या सत्कार सोहळ्याला गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनचे हेमंत डोर्लीकर (संयोजक), संदिप कांबळे (संयोजक), जयंत निमगडे (गडचिरोली वार्ता न्युज),अनिल बोदलकर (एविबी न्युज),उदय धकाते (महाभारत न्युज),किशोर खेवले (लोकप्रवाह न्युज),वेकटेश दुडमवार (गोंडवाना टाइम्स न्युज), बाळू म्हशाखेत्री (विदर्भ क्रांती न्युज), जगदीश कन्नाके(महाराष्ट्र टुडे न्युज) सचिन जीवतोडे (द गडविश्व), नारायण सोनूले (राईट टाइम न्युज) यांची हजेरी होती.
