टिप्परच्या धडकेत दुध व्यावसायिकाचा मृत्यू

लोकशाही न्युज, गडचिरोली(दि,५ फेब्रुवारी)
गडचिरोली शहरालगत कठाणी नदी पुलावर (गडचिरोली -नागपूर) महामार्गावर आज सकाळी १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार मृत्यू पावलेल्या दूध व्यवसायिकाचे नाव मारोती धोंडुजी भोयर वय ५० रा.महादवादी असून तो जागीच मृत्यू पावला आहे.
व्यावसायिक हा दररोजच्या प्रमाणे आपल्या दुचाकी वाहनाने वाहन क्रमांक MH-33-AA-3777 ने गडचिरोली शहरात दूध विक्री करून जनावरांसाठी पशु खाद्य घेऊन आपल्या स्वगावी जात होता,मागून येणाऱ्या टिप्पर क्रमांक MH-33-W 2786 या वाहनाने धडक दिल्याने दूध व्यावसायिक हा जागीच गतप्राण झाला. वाहन चालक हा घटना स्थळावरून पसार झाला आहे. धडक दिलेले वाहन पोलिसांनी जप्त करून सखोल चौकशी करिता पोलीस स्टेशन ला लावले आहे.काही काळ वाहतूक प्रभावित झाली होती.
तातळीने महामार्ग पोलीस घटनास्थळावर पोहोचून पंचनामा करून शवउत्तरिय तपासणी करिता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आलेले आहे.
