आपला जिल्हा
पुराच्या पाण्यात ट्रक मध्ये अडकलेल्या चालकाला काढले सुखरूप

लोकशाही न्युज,गडचिरोली(दि,२४ जुलै)
मागील काही दिवसापासून गडचिरोली जिल्यात व तालुक्यात झालेल्या अति पावसामुळे व गोसीखुर्द च्या धरणातील जास्त पाणी विसर्गामुळे नद्याना पूर आलेला आहे. गडचिरोली जिल्यातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत. अश्यातच काल काही वेळासाठी आरमोरी मार्ग चालू करण्यात आला होता.आरमोरी वरून गडचिरोली ला येणाऱ्या ट्रक चालकाने पाल नदी समोरील पुरात ट्रक टाकला.
त्या ट्रक चालकाला पाण्याचा अंदाज आला नसल्याने तो ट्रक पुरातील पाण्यात मधोमध बंद पडला.काल रात्रभर त्या चालकाने त्या ट्रक वर रात्र काढली व ट्रकचालक वाहनासह अडकल्याची माहिती मिळताच स्थानिक तहसीलदार,पोलीस निरीक्षक गडचिरोली, SDRF पोलीस पथक ह्यांच्या साहाय्याने सदर वाहनचालक राजकुमार कृष्णमूर्थी, जिल्हा एलियार, राज्य तामिळनाडू ह्यांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आले.
