जाहिरात
गडचिरोली पोलीस

आदिवासींच्या सन्मानार्थ “गडचिरोली महा-मॅरेथॉन-२०२४, सिझन २” च्या लोगोचे अनावरण

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२ डिसेंम्बर)

गडचिरोली पोलीस दलातर्फे गडचिरोली जिल्ह्रातील दुर्गम अतिदुर्गम भागातील आदिवासी तरुण युवक-युवतींना स्पर्धेच्या माध्यमातून एक संधी निर्माण व्हावी, तसेच आदिवासी भागात विकास व्हावा यासाठी सामाजिक बांधीलकीच्या दृष्टीने, आदिवासी समाजाच्या विकास व सन्मानास्तव नूतन वर्षात भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेच्या लोगोचे अनावरण शुक्रवार दि, १ डिसेंम्बर रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालयात गडचिरोली जिल्ह्राचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या शुभहस्ते लोगो चे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता व अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख व इतर अधिकारी उपस्थित होते.

या मॅरेथॉन स्पर्धेत, ३ किमी, ५ किमी, १० किमी व २१ किमी अंतराची स्पर्धा आयोजीत करण्यात आली असून, यामध्ये समाजाच्या सर्वच स्तरातून आबालवृद्धांचा सुमारे १३ ते १५ हजार नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे. गडचिरोली महा मॅरेथॉन २०२३ मध्ये दहा हजार नागरिकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत वेगवेगळ्या वयोगटासाठी वेगवेगळे अंतर असून विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे.

सहभागी असलेल्या सर्व धावपटूंना किट, टी-शर्ट, बॅजेस, मेडल्स, प्रमाणपत्रे इ. देण्यात येणार आहे.  पोलीस उपविभागीय अधिकारी मयुर भुजबळ हे स्पर्धेंची संपूर्ण व्यवस्था पाहत आहेत. तसेच या मॅरेथॉन स्पर्धेची नोंदणी मोफत असणार आहे, त्यामुळे अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गडचिरोली पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

१ ते १० डिसेंबर पर्यंत नाव नोंदणी करता येणार,स्पर्धेत सहभागी होण्याऱ्यानी जवळच्या पोलीस स्टेशन/उप पोलीस स्टेशन/पोलीस मदत केंद्र येथे संपर्क साधावा.तसेच या मॅरेथॉन स्पर्धेची नोंदणी मोफत असणार आहे, त्यामुळे अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गडचिरोली पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button