जाहिरात
आपला जिल्हाकोरची

नक्षल्यांकडून आणखी एकाची हत्या

Spread the love

लोकशाही न्युज, कोरची(दि,३डिसेंम्बर)

गडचिरोली जिल्ह्यात पंधरा दिवसात चौथी हत्या, हत्या सत्र थांबता थांबेना आज सकाळी पोलीस स्टेशन कोरची तालुका मुख्यापासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरकुटी येथे एका नागरिकाची हत्या करण्यात आली आहे. गडचिरोली गोंदिया सीमेवर  चमरा मडावी, रा. मुरकुटी यांचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. मृतक हा कट्टर नक्षल समर्थक होता, मृताची बहीण एमएमसी परिसरातील विस्तार प्लाटून ३ ची माओवादी सदस्य असून डीव्हीसीएमची पत्नी आहे.

मृतक चमरा च्या मृतदेहाजवळ सापडलेल्या पत्रकात म्हटले आहे की तो आधी नक्षलवाद्यांसाठी काम करत होता पण नंतर तो अनेक कंत्राटदारांकडून नक्षलवाद्यांच्या नावावर पैसे गोळा करत होता. त्याला पोलीस खबरदार म्हणूनही ओळखले गेले आहे.

नक्षलवाद्यांना राऊंड पुरवण्याच्या प्रयत्नात त्याला गेल्या वर्षी मध्य प्रदेशात बालाघाट येथे अटक करण्यात आली होती आणि काही महिन्यांपूर्वी त्याची तुरुंगातून सुटका झाली होती. या खुनाचा पुढील तपास गडचिरोली पोलीस करत आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button