पतीने केली पत्नीची धारधार शस्त्राने हत्या,कुरखेडा येथील घटना

लोकशाही न्युज, कुरखेडा (दि,१५ सप्टेंबर)
संपादक:संदिप कांबळे
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने धारधार शस्त्राने हत्या केल्याची घटना कुरखेडा शहरात घडली आहे या हत्येने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील शिवसेना (उबाठा) गटाच्या युवती सेनेची शहर प्रमुख राहत सय्यद असे मृतक महिलेचे नाव आहे.सदरची हत्या पहाटे च्या सुमारास झाली.आरोपी तायमिन शेख हा मूळचा गोंदिया जिल्ह्यातला असून तो आपल्या पत्नीच्या गावी कुरखेडा येथे आपल्या पत्नी व आपल्या अपत्या सह राहत होता. नेहमीच तो आपल्या पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेत तिच्याशी झगडा भांडण करत येत होता व शेवटी त्याने टोकाची भूमिका घेऊन तिचा गळा कापून शस्त्राने पोटात भोसकून तिची हत्या केली.
आरोपी तायमिन शेख याला कुरखेडा पोलिसांनी अटक केली आहे.व मृतक महिलेचे शवविच्छेदनासाठी कुरखेडा येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे.
