जाहिरात
राजकीय

भाजपा महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आज गडचिरोलीत

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१३ सप्टेंबर)
संपादक:संदिप कांबळे

भाजपा महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचे आज १३ सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यामध्ये आगमन होत आहेत. त्यानिमित्य स्थानिक नगर परिषद सभागृह चंद्रपूर रोड, येथे दुपारी १ वाजता कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

या कार्यक्रमाला जिल्ह्यातील महिला आघाडी तालुका अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्या यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महिला आघाडी जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी केले आहे.

प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचे सकाळी ११ वाजता स्थानिक इंदिरा गांधी चौक येथे स्वागत होईल त्यानंतर आठवडी बाजार हनुमान वार्ड येथील हनुमान मंदिरात ‘मेरी माटी, मेरा देश’ या उपक्रमाअंतर्गत तेथील माती घेऊन कलश यात्रा व घर-घर चलो अभियान, महा-जन संपर्क, संवाद साधण्यात येईल. दुपारी १ वाजता नवीन नगरपरिषद येथील सभागृहामध्ये बैठकिचे आयोजन केले आहे.

कार्यक्रमास खासदार अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, महिला आघाडी प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, लोकसभा विस्तारक जेष्ट नेते बाबुराव कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, संघटनमंत्री रवींद्र ओल्लारवार, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, आदिवासी आघाडी प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, महिला आघाडी चिटणीस रेखा डोळस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button