अवैध दारु विक्रेत्यास ३ वर्षे सजा, व २५ हजार रु. दंड
गडचिरोली येथील प्रथम श्रेणी न्यायाधीश आर. आर. खामतकर यांचा निर्णय

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१२ सप्टेंबर)
संपादक : संदिप कांबळे
दि,१ जून २०२१ रोजी प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली व पोलीस स्टाफ असे प्रोव्हीजन रेड करीता असतांना गडचिरोली मुख्यालयापासून ७ किमी वर असलेल्या मुरखळा गावात गेले असता मिळालेल्या गोपनिय माहिती च्या आधारे स्वामी नरसय्या गणवेनवार रा. मुरखळा याच्या घराची तपासणी केली असता देशी विदेशी दारु चा अवैध साठा आढळून आला.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार १९२८ रमेश उसेंडी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करुन आरोपी विरुध्द भरपुर व सबळ पुरावा गोळा करुन न्यायालयात दोषरोप पत्र दाखल केले असता न्यायालयाने ३८९/२०२१ अन्वये खटला चालवुन फिर्यादी व साक्षीदार तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्र धरुन आज दि.१२ सप्टेंबर २०२३ ला स्वामी नरसय्या गणवेनवार, वय ५४ वर्ष रा. मुरखळा त. जि. गडचिरोली यास प्रथम श्रेणी न्यायाधीश आर.आर. खामतकर यांनी कलम ६५(इ) अन्वये ३ वर्ष सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
