जाहिरात
दैनंदिन बातम्या

डॉ. नामदेव किरसान यांची गडचिरोली – चिमूर लोकसभा समन्वयक म्हणून नियुक्ती

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,७ ऑगस्ट)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणूक २०२४ च्या कामाला लागले असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशाने राज्यातील ४८ ही लोकसभा क्षेत्राकरिता निरीक्षक आणि समनव्यकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यामध्ये गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राकरिता निरीक्षक म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते आमदार नितीन राऊत तर समन्वयक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निरीक्षक आणि समन्व्यकाच्या नियुक्ती सोबतच काँग्रेसने आता लोकसभेचे रनशिंग फुंकले आहे.

त्यांच्या नियुक्ती बद्दल काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, तालुका अध्यक्ष,शहराध्यक्ष सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button