सुरजागड लोहखदानीत भीषण अपघात, तीन जागीच ठार

लोकशाही न्युज, एटापल्ली (दि,७ ऑगस्ट)
संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव सुरजागड लोहखदानीत काल सायंकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली, अपघातात एक अभियंता व दोन परप्रांतीय मजूर जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
सुरजागड येथे झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला. एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पात रविवारी (६ ऑगस्ट) सायंकाळच्या दरम्यान ही घटना घडली. मृतकांमध्ये सोनल रामगीरवार (वय २६, नागेपल्ली ता. अहेरी जि, गडचिरोली) यांच्यासह हरियाणातील दोन मजुरांचा समावेश आहे. हरियाणातील मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. या घटनेने एटापल्ली, आलापल्ली, अहेरीत तणाव निर्माण झाला असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सुरजागड पहाडीवर लॉयड मेटल्स कंपनीकडून लोह उत्खनन सुरु आहे. या पहाडीवरुन उत्खनन करणारे वाहन खाली कोसळले, हे वाहन खाली उभ्या असलेल्या जीपवर आदळले. तिथे उभे असलेले अभियंता सोनल रामगीरवार आणि अन्य दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर तिघांनाही तातडीने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले.
मृतक अभियंता सोनल चा वर्षभरापूर्वीच झाला होता विवाह
¶¶¶
या घटनेत मयत झालेले अभियंता सोनल रामगीरवार यांचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती झाल्यावर धक्का बसला. नातेवाईकांच्या आक्रोशाने वातावरण सुन्न झाले होते.
अपघातानंतर एटापल्ली,अहेरी, आलापल्ली येथे तणावाची परिस्थिती
¶¶¶
काल सायंकाळच्या वेळी लॉयड मेटल कंपनीच्या खाणीत ही घटना घडली. या अपघातानंतर लॉयड मेटल कंपनी परिसरात तणाव निर्माण झाला होता. मजुरांनी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
