जाहिरात
आपला जिल्हा

जिल्हा परिषद गडचिरोली विविध पदांसाठी २५ ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,७ ऑगस्ट)

शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार जिल्हा परिषद गडचिरोली च्या आस्थापनेवरील गट-क संवर्गाची रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहीरात क्र. 01/2023 दिनांक 05.08.2023 अन्वये प्रसिध्द करण्यात येत आहे.

जिल्हा परिषद गडचिरोली च्या अधिनस्त असलेल्या विविध विभागामधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहीरात क्र. 01/2023 नुसार गट क मधील विविध संवर्गाच्या एकुण 581 रिक्त पदाकरीता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 05.08.2023 पासून ते दिनांक 25.08.2023 पर्यंत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 / या लिंकवर दिनांक 25.08.2023 रोजीचे रात्री 23.59 वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहे.

तसेच जाहीरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, पदांकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत. अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्तों इत्यादी बाबी जिल्हा परिषद गडचिरोली च्या www.zpgadchiroli.in या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध आहेत.. इच्छुक व पात्र उमेदवारास जाहीरात / पदभरती संबंधाने शंका, चौकशी करायची असल्यास अधिक माहिती करीता कार्यालयाचे हेल्पलाईन दुरध्वनी क्रमांक 07132-297463 वर कार्यालयीन वेळ सकाळी 9.45 ते सायं. 6.15 पर्यंत संपर्क साधावा.

असे आवाहन जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, आणि सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी व सचिव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) जिल्हा परिषद गडचिरोली यांनी केले आहे.

 

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button