जाहिरात
आरोग्यगडचिरोली

अण्णा हजारे विचार मंच पदाधिकाऱ्यांनी घेतली डॉ. प्रमोद खंडाते (जिल्हा शल्य चिकित्सक) यांची भेट

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,८ ऑगस्ट)

डॉ. प्रमोद खंडाते जिल्हा शल्य चिकित्सक या पदावर जिल्हा सामान्य रुग्णालय गडगिरोली येथे दुसऱ्यांदा नियुक्ती झाल्याबद्दल अण्णा हजारे विचारमंच जिल्हा- गडचिरोली चे जिल्हा प्रमुख बसंतसिंह बैस,व इतर पदाधिकारी यांचे हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सस्नेह सत्कार करण्यात आला.

डॉ. प्रमोद खंडाते या पूर्वी दिनांक २२/०८/२०१४ ते १४/०६/२०१८ पर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालय गडबिरोली येथे जिल्हा शल्य चिकित्सक या पदावर असताना जनतेच्या आरोग्याकडे विशेष लक्ष घालून डॉक्टर चमू कडून चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध करून दिली. सामान्य रुग्णालयातील आरोग्याविषयी, लागणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशिल राहिले. अण्णा हजारे विचार मंचच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हयात मेडिकल कॉलेज साठी व जिल्हातील बेरोजगार सुशिक्षितांना आरोग्य सेवेत संधी द्यावी यावर चर्चा करण्यात आली.

डॉ. प्रमोद खंडाते यांनी आदिवासी बहुल गडचिरोली जिल्यात आरोग्य सेवेचा चांगला लाभ देता यावा, गोर-गरीबांना मोफत उपचाराची सोया कशी उपलब्ध करून देता येईल. यासाठी शासनाशी पत्र व्यवहार करून आरोग्याविषयी मार्गदर्शन मागविण्याचा सतत प्रयत्न करीन असे मनोगत व्यक्त केले.

या भेटी प्रसंगी रामभाऊ नाईक, सरपंच झाडापापडा,अण्णा हजारे विचारमंचचे जिल्हा उपप्रमुख अनुरथ निलेकार, जिल्हा सचिव देवेन्द्र ब्राम्हणवाडे, तालुका प्रमुख तुलाराम नैताम, तालुका सचिव नरेंद्र पोवनवार, जिल्हा सदस्य कोमेश कत्रोजवार, राजाराम ठाकरे इत्यादी पदाधिकारी हजर होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button